शबनम न्युज :प्रतिनिधी
*महा प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद* :गणेश निबे (अध्यक्ष,निबे लिमिटेड )
तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या उपस्थितीने उपस्थित भारावले !
*’महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’: तिसऱ्या दिवशी मार्गदर्शन सत्रे,सादरीकरणांचे होणार आयोजन*
मोशी , पुणे :‘ सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाच्या शस्त्रसामग्री निर्मितीचे प्रतिबिंब असलेल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ मधे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.२४,२५ फेब्रुवारी रोजी विदयार्थी , नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.पहिल्या दिवशी शनिवारी ६९ हजार,रविवारी महाप्रदर्शनात २ लाखाहून अधिक विद्यार्थी,नागरिकांनी भेट देऊन लष्करी शस्त्र सामग्री आणि तंत्रज्ञान प्रणालींची माहिती करून घेतली.प्रदर्शनाच्या तिन्ही दिवशी दररोज एक याप्रमाणे तिन्ही भारतीय सैन्यदलाचे प्रमुख तसेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ भेट देत आहेत. त्यांच्या भेटी आणि संवादामुळे विद्यार्थी आणि उपस्थित नागरिक भारावून गेले .चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान,हवाई दल प्रमुख व्ही.आर.चौधरी,सैन्यदल प्रमुख मनोज पांडे,नौसेना प्रमुख ऍडमिरल आर.हरी कुमार यांची उपस्थिती सर्वांना प्रेरणा देऊन जात आहे.
तिसऱ्या शेवटच्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारी रोजी चर्चासत्रे,प्रेरक मार्गदर्शन,दालनांना भेटी आणि मिलिटरी बँड, एअर फोर्स बँड, नेव्ही बँडचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या महाप्रदर्शनाच्या संयोजकांच्या वतीने तसेच प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर असलेल्या निबे लिमिटेड या कंपनीच्या वतीने अध्यक्ष गणेश निबे यांनी ही माहिती दिली.सैन्यदलासाठी निर्माण केलेली अत्याधुनिक शस्त्रात्रे,तंत्रज्ञान,प्रणाली या दालनांमधून मांडण्यात आली असून प्रदर्शनाला येणाऱ्या सर्वांना त्याची माहिती देण्यात येत आहे.नागरिकांचा उत्साही प्रतिसाद लाभला आहे.
*बलसागर भारत होवो:संयोजकांची भावना*
‘प्रदर्शनातील वैविध्यामुळे बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो ही भावना प्रत्यक्षात येत आहे . सैन्याला सदैव पुढे नेणारे ,विक्रमांचा उच्चांक करणारे प्रदर्शन अशी या प्रदर्शनाची नोंद होईल’,असा विश्वास निबे लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी व्यक्त केला आहे. निबे लिमिटेड ही कंपनी ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ ची नॉलेज पार्टनर आहे . एल अँड टी,सोलर ग्रुप,टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स ,भारत फोर्ज लिमिटेड हे स्ट्रॅटेजिक पार्टनर असून उद्योग विभाग महाराष्ट्रच्या वतीने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन(डीआरडीओ) च्या सहकार्याने हे महाप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.शेवटच्या दिवशी २६ फेब्रुवारीला जास्तीत जास्त नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी भेट दयावी,असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
*चर्चासत्रे,प्रेरक मार्गदर्शन,दालनांना भेटी आणि नेव्ही,एअर फोर्स बँड चे सादरीकरण*
दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता नेव्ही बँड चे सादरीकरण होणार आहे.साडे नऊ ते पावणे दहा वाजता इंडियन नेव्ही विषयी सादरीकरण करण्यात येणार आहे.सव्वा दहा वाजता एम एस एम ई धोरणाविषयी विद्यार्थ्याना सैन्य दल प्रमुख जनरल मनोज पांडे मार्गदर्शन करतील. नंतर जनरल मनोज पांडे, लेफ्टनंट जनरल जे.बी.चौधरी हे विविध दालनांना भेटी देतील. साडेअकरा वाजता लेफ्टनंट जनरल सी.एस.मान उपस्थितांशी संवाद साधतील. १२ वाजता कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे , दीड वाजता व्हाईस अॅडमिरल एस.व्ही. भोकरे, पावणेदोन वाजता लेफ्टनंट जनरल अदोश कुमार, अडीच वाजता अनील यादव, ३ वाजता जसबीर सिंह सोळंकी, सव्वा तीन वाजता ब्रिगेडियर विकास, साडेतीन वाजता रवी सिन्हा, पावणेचार वाजता मनदीप सिंग, ४ वाजता धनंजय सोनवणे, सव्वाचार वाजता रमेश भाटिया, साडेचार वाजता राहुल पांगरे हे मार्गदर्शन करतील. साडेबारा वाजता आर्मी बँडचे, पावणेपाच वाजता एअरफोर्स बँडचे सादरीकरण होईल. सायंकाळी पाच वाजता महाप्रदर्शनाच्या समारोपाचा कार्यक्रम होईल