पिंपरी चिंचवड शहरात योगशिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या वैशाली आनंद देशमाने यांना योग भूषण पुरस्कार देण्यात आला आहे.
वैशाली देशमाने या श्रीहरी योगा स्टुडिओ या माध्यमातून चिंचवड परिसरातील महिलांचे व शहराबाहेरील महिलांचे सुद्धा योगा क्लास घेतात.
विशेषात: महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात पाहिजे तेवढी आरोग्याची काळजी घेत नाहीत व कुटुंबातील महिला निरोगी तर कुटुंब निरोगी म्हणून प्रत्येक महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे याचं उद्देशाने वैशाली देशमाने यांनी श्रीहरी योगा स्टुडिओ या माध्यमातून महिलांना योगाच्या माध्यमातून आरोग्य सुदृढ राहण्याच्या हेतूने जास्तीत जास्त महिलांचे क्लास व प्रभोधन केले जाते विशेष म्हणजे भारता बाहेरील सुद्धा अनेक महिला या योगा क्लासला जोडल्या आहेत.
रामकृष्ण मोरे सभागृहात संपन्न झालेला हा पुरस्कार सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.यावेळी श्रीहरी योगा स्टुडिओच्या महिला सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या