शबनम न्युज | पुणे
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते संपादिका सुरेखा मते यांना महाराष्ट्र उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतेच स्विफ्टएनलिफ्ट मीडियाच्या वतीने ‘महाराष्ट्र बिजनेस अचिव्हर्स अवाॅर्ड २०२४’ पुरस्कार सोहळा पुण्यातील हॉटेल लेमन ट्री येथे आयोजिला होता.
उद्योग विश्वातील यशस्वी, तसेच कठीण परिस्थितीतही न डगमगता, धीराने व धाडसाने यश मिळवणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. संयोजक निलेश साबे यावेळी उपस्थित होते.
प्रार्थना बेहेरे म्हणाल्या, “माझी सुरूवातीची वाटचाल पत्रकारीतेच्या माध्यमातून झाली होती. तुम्हाला हा पुरस्कार माझ्या हस्ते देताना मला अतिशय आनंद होत आहे. माझ्याच क्षेत्रातील व्यक्ती माझ्याच हस्ते सन्मानित होत आहे, याचा मला आनंद वाटतो.” सुरेखा मते म्हणाल्या, पुरस्कार मिळणे म्हणजे जबाबदारीत वाढ होणे आहे. निलेश साबे आणि प्रार्थना बेहेरे यांनी दिलेल्या पुरस्कारामुळे माझ्या जबाबदारीत अधिक वाढ झाली आहे.
या बिझनेस ॲवॉर्डच्या माध्यमातून उद्योजकांना आपला व्यवसाय इतरांपर्यंत पोहोचवता येतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उद्योजकांची ओळख होऊन व्यावसायिक संबंध तयार होतात. शाबासकीची थाप माणसाला पुढील यशाच्या अनेक पायऱ्या चढण्याची उमेद देते, असे निलेश साबे यांनी सांगितले.