शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पुणे हे देशाच्या विविध प्रांतांतील तरूणाईचे प्रतिनिधीत्व करणारे कॉस्मोपॉलिटन केंद्र होत असून कुतुहलापोटी या शहराशी नाते जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी नुकतेच येथे केले. सोनाक्षी आणि सृष्टी राय यांनी नेलपेन्टच्या व्यावसायिक कलाकारी क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांच्या ‘सोइझी’ स्टार्टअपच्या ‘प्रेस ऑन नेल’ ब्रॅण्डच्या देशातील पहिल्या विक्री केंद्राचे उद्घाटन पुण्यात करण्यात आले, त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ती बोलत होती.
यावेळी मगरपट्टा सिटीतील सिझन्स मॉलमध्ये झालेल्या समारंभास फॅशन क्षेत्रातील रुपाली हसीजा, आशना भगवानी आणि शौर्य सनाढ्य आदी कलाकर्मी उपस्थित होते. सोनाक्षी आणि सृष्टीच्या उपस्थितीत व्यावसायिक नेल आर्टिस्ट्सनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांना पाहण्यासाठी तरूणाईने मोठी गर्दी केली होती.
पत्रकारांशी बोलताना सृष्टी राय म्हणाली, या व्यवसायास ऑनलाईनवर मोठा प्रतिसाद मिळत असूनही आम्ही ऑफलाइनची सुरुवात पुण्यातून करत आहोत. देशभरात या प्रकारचे कियॉस्क उभारण्याचे उद्दिष्ट आहे. ‘सोइझी’ रिटेल स्टोअर्समध्ये नाविन्यपूर्ण कलेक्शन्स आणि व्हर्च्युअल ट्राय-ऑन सादर करण्याचे नियोजन आहे.