शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने सामाजिक उपक्रम
सक्षम महिला बचत गटांचा हि होणार सन्मान
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारिता क्षेत्रात मागील आठ वर्षापासून कार्यरत असलेल्या शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श नारी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
अनाथांची माय पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या व सन्मती बालनिकेतन संस्थेच्या व्यवस्थापक ममता सिंधुताई सपकाळ यांच्या शुभहस्ते आदर्श नारी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे, माजी उपमहापौर शैलजाताई मोरे ,सरिता साने सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना महिला शहर प्रमुख सरिताताई साने व माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आदर्श नारी पुरस्कार सोहळ्यात ज्या पुरस्कारार्थी सक्षम महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये माजी नगरसेविका सौ वैशाली घोडेकर, उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ कुंदाताई भिसे, केंब्रिज स्कूलच्या संचालिका शितल वर्णेकर, दैनिक केसरीच्या पत्रकार सौ.कल्पना खरे, माजी नगरसेविका सौ. स्वाती माई काटे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस, सामाजिक कार्यकर्त्यां सौ. गीता महेंद्रू, सामाजिक कार्यकर्त्यां सौ. हिना मुलाणी, सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचन जावळे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. शशिकाला सपकाळ, नऊवारीनार कलादालन च्या संचालिका सौ. चैताली भोईर, क्रीडा प्रशिक्षक सौ. श्रद्धा शेलार, व सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुगंधा पाषाणकर यांना आदर्श नारी पुरस्कार शबनम न्यूज मीडिया वतीने जाहीर करण्यात आला आहे.
सदर पुरस्कार सोहळ्यात सक्षम महिला बचत गटांचा ही सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये उन्नती शक्ती महिला बचत गट, उन्नती शीतला महिला बचत गट, विनायक महिला बचत गट, प्रथमेश महिला बचत गट, चिंतामणी महिला बचत गट, पवना महिला बचत गट, संस्कृती महिला बचत गट, रिद्धी सिद्धी महिला बचत गट, सखी महिला बचत गट, स्त्री आधार केंद्र महिला बचत गट या सर्व सक्षम महिला बचत गटातील महिलांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार सोहळा हा 11 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता ऑटो क्लस्टर सभागृह चिंचवड येथे संपन्न होत आहे.
अशी माहिती आदर्श नारी पुरस्कार सोहळ्याच्या आयोजक तथा शबनम न्यूज वृत्तसंस्थेच्या संस्थापक संपादिका शबनम सय्यद यांनी दिली आहे. तसेच सदर कार्यक्रमास महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन केले आहे.