शबनम न्युज | पुणे
कजाकस्तान देशात सुरू असलेल्या इंटरनॅशनल मास्टर ब्रेस्टलींग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 या कुस्ती प्रकारात आज पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील जागतिक सुवर्णपदक विजेते पैलवान सुमित अरविंद भोसले यांनी भारत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याचे देशातून अभिनंदन होत आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर सुमित भोसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी आपण भारताला सुवर्णपदक मिळवून दिले हे माझे भाग्यच आहे, असे म्हटले आहे.
सुमित भोसले यांनी कारकल्पकस्तान देशाच्या मल्लावरती अंतिम लढतील विजय मिळवला तर उझबेकिस्तान, कोरिया, युक्रेन देशातील खेळाडूंना देखील पराभूत केले.
यावेळी बोलताना सुमित म्हणाला, माझ्या विजयाचे श्रेय मी अखंड हिंदुस्थानचे दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, शाहू, फुले, आंबेडकरांना तसेच माझ्या पिंपरी चिंचवड व सांगवी गावाला देतो. सदर स्पर्धेकरिता वस्ताद ताराचंदभाऊ कलापुरे, भारत केसरी विजय भाऊ गावडे, मुंबई महापौर केसरी देवेंद्र भाऊ पवार, पुणे केसरी समीर कोळेकर, आशियाई सुवर्णपदक विजेते अमोल साठे सर, सोमाटणे केसरी लक्ष्मण जाधव व राष्ट्रीय खेळाडू मारुती वर्पे यांचे मला मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे प्रथमता मी आभार व्यक्त करतो. तसेच आपण भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याचे मला भाग्य मिळाले, असे म्हटले आहे.