शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाच्या कु.मनीषा राठोड हिस आझम कॅम्पस पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा सन २०२४चा” श्रीमती आबेदा इनामदार स्पोर्ट्स एक्सलन्स पुरस्कार”दिनांक २३/३/२०२४ रोजी तिच्या कबड्डी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपूर्वक देण्यात आला.
श्री मिनीनाथ दंडवते उपायुक्त, श्री मनोज लोणकर उपायुक्त,श्री संदीप खोत उपायुक्त, श्रीमती आशा राऊत उपायुक्त, श्रीमती सुषमा शिंदे सहाय्यक आयुक्त, श्री अजिंक्य येळे साहेब आयुक्त ग प्रभाग, श्रीमती अनिता केदारी क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड मनपा, श्रीमती शीतल मारणे मुख्य लिपिक क्रीडा विभाग तथा शिवछत्रपती पुरस्कारार्थी, श्री दत्ता झिंजुर्डे सर कार्यवाहक पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, श्री इमरान शेख पुणे जिल्हा पंचप्रमुख तथा सदस्य, श्री बाबासाहेब राठोड मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव यांनी विशेष अभिनंदन करून कौतुक केले. कु. मनीषाला श्री बन्सी आटवे क्रीडा पर्यवेक्षक व श्रीमती सोनाली जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे .