शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील मोरेवस्ती परिसरामध्ये गेले दोन दिवसापूर्वी 5 मेडिकल व 2 किराणा दुकाने फोडून चोरी करण्याचे प्रकार घडले या घाटाने ची बातमी या परिसरातील राष्ट्रवादी चे विद्यार्थी शहराध्यक्ष यश दत्ता काका साने यांना मिळताच साने यांनी तत्काळ चिखली पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काटकर साहेब यांना माहिती दिली.
परिस्थितीचे गांभीर्य पाहून तत्काळ सर्व पोलीस अधिकारी व यश दत्ता काका साने यांनी चोरीचे प्रकार घडलेल्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच मेडिकल असोसिएशन चे पदाधिकारी यांनीही निवेदन देत घडलेल्या प्रकाराबाबत तपासाची चक्रे फिरवण्याची विनंती केली.
या प्रसंगी चिखली पोलीस स्टेशनच्या वतीने लवकरात लवकर तपास करून गुन्हेगारांना अटक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
आपल्या परिसरातील नागरिकांना यश दत्ता काका साने यांनी विनंती केली की सर्वांनी सजग राहून संशयास्पद व्यक्तीची माहिती पोलीस स्टेशन यांना कळवावी. तसेच सदरील घटनेचा लवकरात लवकर तपास करून गुन्हेगारांना अटक करण्यात यावी असे निवेदन यश साने यांनी पोलीस प्रशासनास दिली या वेळी त्यांच्या सोबत युवा नेते विश्वनाथ उर्फ मनोज जरे व सहकारी उपस्थित होते.