शबनम न्युज : प्रतिनिधी
पिंपरी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने पिंपरी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला संस्थेचे अध्यक्ष रामा भोरकडे यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच यावेळी संस्थेच्या वतीने बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायांना तृतीयपंथी बांधवांच्या वतीने मिठाई चे वाटप करण्यात आले व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या सचिव सिद्धी कुंभार यांनी असे मत व्यक्त केले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात स्त्री अथवा पुरुष असा उल्लेख न करता व्यक्ती हा उल्लेख केल्यामुळे आज तृतीयपंथी समाजाला देखील सन्मानाने जगता येते आमच्या हक्क अधिकारासाठी लढता येते .बाबासाहेबांनी आम्हाला दिलेल्या हक्क अधिकार यांच्या प्रती कृतज्ञता बाळगण्यासाठी आम्ही संस्थेच्या वतीने आज मिठाई वाटप करून हा आनंदोत्सव साजरा केला आणि दरवर्षी करत राहू.. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामा भोरकडे,सचिव सिद्धी कुंभार,खजिनदार निलेश पवार, उपाध्यक्ष रुतिका परमार, मिनाक्षी घोडके ,सदस्य- रोहिणी मोरे ,रिद्धी जाधव, दामिनी हे उपस्थित होते.