शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२२डिसेंबर) :- पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरातील महानगरपालिकेची शाळा क्रमांक ८९ या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात खाली बसावे लागते. या विद्यार्थ्यांना बेंचेस उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी कुदळवाडी परिसरातील प्रभाग सदस्य दिनेश यादव यांनी शिक्षण मंडळ विभागाचे उपायुक्त यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, कुदळवाडी येथील मनपा शाळा क्रमांक ८९ सुरू झाली असून मुलांना वर्गात बसण्यासाठी बेंचेस ची सुविधा नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्वरित बेंचेस उपलब्ध करून द्यावेत, यांच्या मागणीचा सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांनी बेंचेस लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील असा शब्द दिला.
सध्या सर्व शाळा सुरू झाले आहेत, मुले आता हळूहळू शाळेत येत आहेत, मुलांना शाळेत येण्याची सवय लागली आहे.परंतु ,कुदळवाडीतील या शाळेत मुलांना बसण्यासाठी बेंच सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना बसून व्यवस्थित शिक्षण घेता येत नाही. तसेच बेंचेस उपलब्ध झाल्यानंतर या मुलांना व्यवस्थित बैठक व्यवस्था उपलब्ध होतील. याकरिता आपण शिक्षण विभागाकडे बेंचेस सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे असे प्रभाग सदस्य दिनेश यादव यांनी सांगितले.