शबनम न्युज | पुणे
आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरला आयुष्यातील मानाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.गेल्या काही वर्षांत विविधांगी भूमिका साकारून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.याची खास पोस्ट अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
“माझा पहिला फिल्मफेअर पुरस्कार…अजूनही विश्वास बसत नाहीये.” असं कॅप्शन देत प्रियदर्शिनीने खास पोस्ट शेअर केली आहे.याशिवाय पोस्ट शेअर करत प्रियदर्शिनीने कुटुंबीय, निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार यांचे आभार मानले आहेत.
Advertisement
‘फुलराणी’ चित्रपटातील भूमिकेसाठी प्रियदर्शिनीला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.सर्वोकृष्ट पदार्पण ( अभिनेत्री ) या पुरस्कारावर तिने नाव कोरलं आहे.
Advertisement
Advertisement