‘माती से बंधी डोर’ मालिकेतून करणार ऋतुजा हिंदी मालिकेत पदार्पण
शबनम न्युज | पुणे
मराठी चित्रपटसृष्टीत ‘लंडन मिसळ’ सारख्या बहुचर्चित चित्रपटात अभिनय करणारी तसेच सर्वांच्या पसंतीची अभिनेत्री ऋतुजा बागवे हिंदी मालिका विश्वात पदार्पण करीत आहे. मराठी चित्रपटातील अनेक अभिनेते, अभिनेत्री हिंदी चित्रपटात पदार्पण करीत आहेत. हिंदी मालिकाविश्वात आपल्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये एन्ट्री करत आहेत. त्यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तसेच अभिनेत्री ऋतुजा बागवे ही देखील हिंदी मालिका विश्वात एन्ट्री करणार आहे. ऋतुजा ‘माती से बंधी डोर’ या नवीन हिंदी मालिकेतून पदार्पण करीत आहे. ऋतुजा ही ‘वैजू’ नावाची भूमिका ती साकारत आहे.
याप्रसंगी बोलताना ऋतुजा म्हणाली की, “मी कित्येक दिवसापासून चांगल्या भूमिकेच्या शोधात होते. नाटक, सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. पण पुन्हा मालिका करावीशी वाटत होती. पडद्यावर सतत दिसणे, ही कलाकारांची गरज झाली आहे. मालिका हे माध्यम कलाकाराला खूप काही देत असते. बाहेरून सोपे वाटणारे हे माध्यम आम्हा कलाकारांसाठी आव्हानात्मक असते. सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आहे, पण वेगळ्या भूमिका साकारायला मिळायला हवा, असे वाटत असताना या मालिकेविषयी विचारणा झाली. दिग्दर्शक कथा आणि भूमिका यांचा विचार करून मालिका स्वीकारली, असे ऋतुजा हिने म्हटले आहे.
तसेच या मालिकेचे दिग्दर्शन भिमराव मुळे करत आहेत. हे मालिका एका कन्नड मालिकेचा रिमेक आहे.