वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
शबनम न्युज / मुंबई
१९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील ७२ तासांत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) April 15, 2021
या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलणे बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहिती ही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ट्विट करत दिली आहे.