पुणे, दि. 15 : पुणे विभागातील 7 लाख 96 हजार 658 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 लाख 39 हजार 846 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 24 हजार 434 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 18 हजार 754 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.00 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.76 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 6 लाख 76 हजार 14 रुग्णांपैकी 5 लाख 68 हजार 2 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 97 हजार 115 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.61 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.02 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 76 हजार 528 रुग्णांपैकी 64 हजार 635 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 928 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 965 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 74 हजार 415 रुग्णांपैकी 62 हजार 456 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 776 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 57 हजार 499 रुग्णांपैकी 50 हजार 758 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 869 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 872 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 55 हजार 390 रुग्णांपैकी 50 हजार 807 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 746 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 837 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 11 हजार 114 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 7 हजार 888, सातारा जिल्ह्यात 1 हजार 100, सोलापूर जिल्ह्यात 976 , सांगली जिल्ह्यात 762 तर कोल्हापूर जिल्ह्यात 388 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 974 आहे. पुणे जिल्हयामध्ये 10 हजार 578, सातारा जिल्हयामध्ये 181, सोलापूर जिल्हयामध्ये 747, सांगली जिल्हयामध्ये 314 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 154 रुग्णांचा समावेश आहे.