शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आशा सेविका यांच्या मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादीच्या नगरसेविका निकिता कदम यांनी आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदन दिले. या निवेदनात निकिता कदम यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आशा सेविका या कोरोना महामारी मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता, दिवस-रात्र काम करीत आहेत. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हावे, याबाबतची मागणी केली.
जागतिक महामारी covid-19 च्या आजाराच्या या दोन वर्षाच्या कालावधीत आशा सेविकांनी कोविड योद्धा म्हणून आपले काम केले आहे. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली आहे. त्यांच्या विविध मागण्या आहेत. त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, याकरिता नगरसेविका निकिता कदम यांनी आज आशा सेविकांची बैठक घेतली त्यांच्याशी चर्चा केली. व त्यांच्या मागण्या समजून घेतल्या व त्यांच्या मागण्या संदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन दिले.