शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरिता भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे, अशी माहिती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना सचिन चिखले म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमी सांगतात की, “जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधींचे निधन होते, तेव्हा ती पोट निवडणूक बिनविरोध करावी,” याच अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड शहरातील मनसे अश्विनी जगताप यांना पाठिंबा देत आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष, आमदार महेश लांडगे, एकनाथ पवार, मनसेचे नेते राजेंद्र वागस्कर ,अनिल शिदोरे, प्रभारी किशोर शिंदे, अनुप मोरे, आरपीआयचे अध्यक्ष स्वप्निल कांबळे आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी चिखले म्हणाले की, या निवडणुकीमध्ये सध्या तरी पक्षाचे कोणतेही कार्यकर्ते प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होणार नाहीत, तसेच पुढील नियोजन राज साहेब यांच्या आदेशाने केले जाईल.