- वृक्षसप्ताह मध्ये लावली जाणार तब्बल ३११ देशी झाड !!
- झाडे लावण्यासाठी पुढे येऊ या !! आपला प्रभाग हरित प्रभाग या संकल्पनेला हातभार लावूया !!
शबनम न्युज / पिंपरी
चिंचवडे नगर प्रभाग क्रमांक १७ मध्ये वट पौर्णिमेचे औचित्य साधून ३० जोडपी यांच्या हस्ते वृक्षरोपण सप्ताह चा शुभारंभ करण्यात आला, यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर सौ. माई ढोरे, नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे, श्री शेखर आण्णा चिंचवडे, श्री राजेंद्र चिंचवडे, श्री आबा पडवळ,श्री.घाणेकर, श्री.महेंद्र चिंचवडे, श्री.दत्ता चिंचवडे, श्री.विशाल गडगूळ, श्री.कमलाकर गोसावी, सीताराम रेमजे, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे सदस्य व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रभागातील ३० जोडपी आणि ३० वड अस नवीन संकल्पना असलेले वृक्षरोपण करत असताना बिजलीनगर चौक ते चिंचवडे फार्म चौक या स्पाईन रोड या रस्त्यावर शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन व नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे यांच्या संकल्पनेतून ३११ वड पिंपळ चिंच कडुनिंब अशी देशी झाड लावण्याचा निश्चय केला असून वृक्षरोपण सप्ताह या संकल्पनेतून आज बचतगटातील महिला भगिनी व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते वडाची झाडे लावण्यात आली यांनतर संपूर्ण सप्ताहात या काळामध्ये आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजनांच्या स्मृती प्रित्यर्थ, कोरोना योद्धा, पोलीस प्रशासन, जेष्ठ नागरिक संघ, स्वयंसेवी संस्था यांच्या शुभहस्ते बाकीही सर्व झाडे लावण्याचे प्रयोजन आहे.
आपल्या परिसरात देशी वृक्षांचे प्रमाण वाढावे आणि प्रत्येकाने आपली जबाबदरी ओळखून वृक्ष संवर्धनसाठी कृतिशीलपणे पुढे यावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री.शेखर चिंचवडे यांनी सांगितले.
यावेळी चिंचवडे नगर विभागातील मान्यवर 30 जोडपी, चिंचवडे नगर जेष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी सदस्य, चिंचवडे नगर मधील रहिवाशी कॉलन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते सोबत बचत गटामधील महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.