शिवसंपर्क अभियानाचा आकुर्डीत शुभारंभ
पिंपरी : प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेचे विचार, ध्येयधोरणे प्रत्येकांच्या मनामनात, घरोघरी पोचविण्यासाठी शहर शिवसेनेचे पदाधिकारी सज्ज झाले आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे विचार पोचविण्यात येणार
आहेत. तीनही विधानसभा मतदार संघात हे अभियान राबविण्यात येणार आहे. आकुर्डी येथील शिवसेना
भवनमध्ये आज (मंगळवार) या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अशी माहिती शिवसेना शहराध्यक्ष तथा
नगरसेवक ऍड. सचिन भोसले यांनी दिली.
आकुडीं शिवसेना भवनमध्ये शहराध्यक्ष तथा नगरसेवक ऍड. सचिन भोसले यांच्या उपस्थितीत ही बैठक
आयोजित करण्यात आली. यावेळी शहर उपप्रमुख, संघटक, समन्वयक, सर्व कार्यकारिणी व पदाधिकारी आदी
उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने
राज्यातील जनतेच्या हितासह लोककल्याणासाठी राबविलेल्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्याचे काम
शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाचा विचार तळागाळात पोचविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक
मतदारसंघात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार 14 जुलै ते 17 जुलै पर्यंत पिंपरी
विधानसभा मतदारसंघात, 18 ते 20 जुलै रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघात तर 21 ते 24 जुलै रोजी
भोसरी मतदारसंघात हे अभियान राबविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र
मिर्लेकर, संपर्क प्रमुख बाळा भाई कदम आदींच्या मार्गदर्शनाने हे अभियान राबविण्यात येणार आहे.
यामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी तिन्ही विधानसभा अध्यक्ष, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख यांच्या बैठका
घेतल्या जाणार आहेत. त्यांच्याकडून बूथ कमिटी बांधणी, पक्षवाढीच्या दुष्टीने चर्चा, विचारविनिमय करणार
आहेत. पक्षाचा विचार घरोघरी पोचविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पक्ष संघटनवाढ, पक्षाची बुथ निहाय
बांधणी करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष तथा नगरसेवक ऍड. सचिन भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
दिली.
या कार्यक्रमाला राजेश वाबळे (पिंपरी विधानसभा प्रमुख), रोमी संधू (शहरसंघटक),भाविक देशमुख (शहर समन्वयक),
तुषार नवले (उपशहर प्रमुख), अमोल निकम (उपशहर प्रमुख), पांडुरंग पाटील (उपशहर) प्रमुख, ज्ञानेश्वर शिंदे
(कार्यलय प्रमुख) अनंत कोराळे (चिंचवड विधानसभा प्रमुख), उपशहर प्रमुख हरेश नखाते, सोमनाथ गुजर, संतोष पवार, सुधाकर नलावडे, दिलीप भोंडवे, सचिन प्रभाकर सानप (शिवसेना संघटक), पिंपरी चिंचवड शहर अनिल सोमवंशी (उपशहर प्रमुख), शैलेश मोरे (उपशहर प्रमुख), आबा लांडगे (भोसरी विधानसभा संघटक), दादा नरळे
(भोसरी विधानसभा संघटक), राहुल भोसले (भोसरी विधानसभा समन्वयक), ऋषिकेश जाधव (भोसरी विधानसभा समन्वयक), सचिन सानप, रवींद्र खिलारे (उपशहर प्रमुख) आदी या वेळी उपस्थित होते.