शबनम न्युज | पुणे
शिरूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.आफताब अन्वर शेख यांना निवडणूक आयोगाने प्रेशर कुकर हे चिन्ह दिले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. आफताब अन्वर हे प्रेशर कुकर चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असे दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या दिग्गजांचे विरोधात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. आफताब अन्वर शेख निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीत आपल्याला नक्कीच यश मिळेल, असा आत्मविश्वास डॉ.आफताब अन्वर शेख यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.
Advertisement