शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच कोरोना काळात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबवून समाज उपयोगी योगदानाबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील स्व. दत्ता काका साने प्रतिष्ठान संस्थेचा छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळजापूर येथे आयोजित शंभू शौर्य सोहळ्यानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात स्व . आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित दादा पाटील तसेच आमदार हर्षवर्धन जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
हा सन्मान स्वीकारल्यानंतर स्वर्गीय दत्ता काका साने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष यश साने यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमचा सत्कार तसेच आमच्या प्रतिष्ठानच्या कामाची दखल घेतल्याबद्दल आम्हाला याचा अभिमान आहे. तसेच या सन्मानाचा आम्ही मनापासून स्वीकार करतो. मी या बद्दल छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती चे मनापासून आभार व्यक्त करतो.