पिंपरी चिंचवड शहरातील माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. येत्या 15 ऑगस्ट रोजी नाना काटे यांचा वाढदिवस साजरा होत आहे या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील शामभाऊ जगताप मित्रपरिवार त्यांच्या वतीने महाआरोग्य शिबिर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू दिले जाणार आहे. तसेच शिबिरा स्थळी सर्व तपासण्या आणि उपचार मोफत करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दातांचे उपचार, हृदयरोग, कॅन्सर शस्त्रक्रिया उपचार व तपासणी, जनरल शस्त्रक्रिया, मणके विकार शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या महत्त्वाच्या तपासण्या व उपचार शिबिरामध्ये घेतल्या जाणार आहेत सदर रक्तदान शिबिर 13 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत संस्कृती लॉन्स मंगल कार्यालय नवी सांगवी पिंपरी चिंचवड येथे होणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते शाम जगताप यांनी केले आहे.