शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील माजी नगरसेवक संजय (नाना) काटे,यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त “नेत्रचिकित्सा शिबिराचे” आयोजन करण्यात आले. या शिबिरास प्रभागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला. यामध्ये अनेकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. यामध्ये आवश्यक असणाऱ्या नागरिकांना चष्म्यांचे मोफत वाटप ही करण्यात आले.
सध्या दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत असताना सर्व क्षेत्रातील कामगार नागरिक कर्मचारी यांना त्यांच्या कंपनीमार्फत अथवा त्यांच्या नोकरीच्या ठिकाणाहून पगारवाढ व बोनस इत्यादी मिळत असते. यातूनच हे कामगार आपली दिवाळी आनंदाने साजरी करतात. रिक्षाचालकांची ही दिवाळी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी व्हावी, या प्रामाणिक हेतूने रिक्षाचालकांना माजी नगरसेवक संजय नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त गणवेशाचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी रिक्षाचालकांनी माजी नगरसेवक संजय नाना काटे यांचे आभार व्यक्त केले.
दापोडी परिसरातील नागरिकांना पोस्ट ऑफिस मार्फत शासकीय योजनांची माहिती योग्य प्रकारे मिळावी ,या हेतूने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक संजय नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले. यामध्ये पोस्ट खात्यामार्फत विविध योजनांची माहिती नागरिकांना यावेळी देण्यात आली. तसेच आधार कार्ड हा सर्व ठिकाणी उपयोगात आणली जाणारी महत्त्वाची कागदपत्रे या प्रकारात मोडली जात आहे. परंतु या आधार कार्ड मध्ये अनेक नागरिकांना सुधारणा करावयाचे असतात. परंतु त्यांना या सुविधा उपलब्ध होत नाही. माजी नगरसेवक संजय नाना काटे यांनी ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली. आधार कार्ड मधील झालेल्या चुका तसेच नावाची दुरुस्ती अशा विविध दुरुस्ती आधार कार्ड मध्ये व्हावी, या दृष्टिकोनातून आधार कार्ड दुरुस्ती चा शिबिरही यावेळी आयोजित करण्यात आला. या शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
केंद्र शासनामार्फत आरोग्याच्या सुविधा नागरिकांना मोठ्या प्रमाणात मिळाव्या, या दृष्टिकोनातून आयुष्यमान भारत कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. दापोडी परिसरातील नागरिकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा. या हेतूने आयुष्यमान भारत कार्ड योजनेबाबत माहिती देऊन सदर चे कार्ड नागरिकांना माजी नगरसेवक संजय नाना काटे यांच्या वाढदिवसा निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आले.या आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत नागरिकांना विविध आरोग्याच्या सुविधा मिळणार असून पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत होणार आहे. तसेच विविध अनेक प्रकारच्या सुविधा या आयुष्यमान भारत कार्ड मार्फत नागरिकांना देण्यात येणार आहे. सदरची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी माजी नगरसेवक संजय नाना काटे यांचे आभार व्यक्त केले.
सम्राट अशोक बुद्ध विहार आबा काटे चाळ दापोडी येथे महिलांसाठी खास “आरोग्य शिबिराचे” ही आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 320 महिलांनी सहभाग घेतला.नानावटी हॉस्पिटल, मुंबई येथील सिस्टर शेख मॅडम यांनी महिलांची तपासणी केली, हिमोग्लोबिन, शुगर, बीपी, वजन तपासले व महिलांना त्यांचे रिपोर्ट ही देण्यात आले. यामध्ये ही नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. एस. बी पाटील साहेब उद्योजग, संतोष लक्ष्मण काटे उद्योजग ,विलास अण्णा काटे, तानाजी काटे सामाजिक कार्यकर्ते ,जयवंत मोरे चंद्रकांत काटे पाटील, ज्ञानेश्वर भाडाळे, ज्येष्ठ नागरिक शहा साहेब इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोरे सर, यांनी केले व आभाराचे काम धनराज कांबळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निखिल मते,कालीचरण पाटोळे सर, सद्गुरू काटे, दावीद बळीद, लाला किंडरे, जयसिगं काटे परिश्रम घेतले.