शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक जण आपला वाढदिवस साजरा करतात. काहीजण वाढदिवसाचे औचित्य साधत अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवितात. पण आकुर्डी गंगा नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रवी गोडेकर आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत आहेत.
उद्या 26 जून रोजी रवी गोडेकर यांचा वाढदिवस. यानिमित्त सामाजीक ऋणातून थोडे का होईना उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून कोरोनाने घात करून ज्या चिमुरडयांचे मायेचे छतच हिरावुन घेत अनाथपणाच्या अंधारात लोटले आहे. अशांसाठी रवी गोडेकर एक आशेचा किरण बनुन पुढे येत आहे.या चिमुरड्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारत आहेत. नक्किच यामुळे समाजासमोर नवा आदर्श मांडला जाणार आहे. या बरोबरच दि. 24 जुन रोजी वटपौर्णिमेचे औचित्य साधत सकाळी 9 वा वृक्षारोपण कार्यक्रम तसेच पंचतारानगर, गंगा नगर, गुरुदेव नगर, क्रांतीनगर, ओटास्किम परिसरामध्ये महिला भगीनींना तुळशी रोपांचे वाटप तसेच दि.25 जुन रोजी परिसरातील गरजु नागरीकांना छत्री तसेच फेरीवाले भाजी / फळ विक्रेते यांना रेनकोट वाटप करण्यात आले. दि. 25 जुन रोजी शिख धर्मगुरू हरगोविंदसिंह जी जयंती निमित्त अकुर्डी गुरुव्दारा येथे धान्य दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाज रक्षणासाठी सदैव तत्पर अशा पोलिस बांधवांसाठी अत्याधुनिक व्यायाम साहीत्य आणि वॉटर प्युरीफायर डिस्पेंसर (गरम आणि गार पाणी) बसवण्यात येणार आहे.