शबनम न्युज / पुणे
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 19 नोव्हेंबर 2020 च्या पत्रानुसार मतदार यादीत छायाचित्र यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अदयावतीकरण करणे कार्यक्रम घोषित केला आहे. 213 हडपसर विधानसभा मतदार संघाच्या एकूण 455 यादी भागामधील 51154 मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये दिसून येत नाहीत.
सदर छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या नावांची यादी व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची दूरध्वनी क्रमांकासहीत यादी जिल्हाधिकारी पुणे (www.puncnic.in) व पुणे महानगरपालिका (www.punecorporation.org) या website वर पाहणेकरीता उपलब्ध केलेले आहेत. ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत त्यांनी त्यांचे अलीकडच्या काळातील रंगीत छायाचित्र व रहिवास पुराव्यासह जिल्हा पुनर्वसन कार्यालय अंतर्गत 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे कार्यालय, ए विंग तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे 01 आणि हडपसर-मुंढवा, रामटेकडी- वानवडी, कोंढवा- येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय, पुणे 06 येथे समक्ष अथवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे बातमी प्रसिध्द झाल्यापासून 8 दिवसांत जमा करण्याचे आवाहन श्री. उत्तम पाटील मतदार नोंदणी अधिकारी 213 हडपसर विधानसभा मतदार संघ यांचेकडून करण्यात आले आहे. ज्या मतदारांचे या कालावधीत रहिवास पुरावा व छायाचित्र जमा होणार नाहीत त्यांची नावे मतदार यादीतून वगळणी करणेबाबतची पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. असे मतदार नोंदणी अधिकारी 213 हडपसर विधानसभा मतदारसंघ यांनी कळविले आहे.