शबनम न्युज / पुणे
पुणे विभागातील 16 लाख 24 हजार 589 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 लाख 1 हजार 606 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 41 हजार 552 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 35 हजार 465 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.47 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 48 हजार 708 रुग्णांपैकी 10 लाख 21 हजार 374 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 592 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.39 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 91 हजार 931 रुग्णांपैकी 1 लाख 77 हजार 978 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 342 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 611 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 62 हजार 811 रुग्णांपैकी 1 लाख 56 हजार 540 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 882 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 389 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 43 हजार 824 रुग्णांपैकी 1 लाख 31 हजार 24 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 760 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 54 हजार 332 रुग्णांपैकी 1 लाख 37 हजार 673 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 976 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 894 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 728, सातारा जिल्ह्यात 496, सोलापूर जिल्ह्यात 221, सांगली जिल्ह्यात 1 हजार 73 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 376 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 249 आहे. पुणे जिल्हयामध्ये 755, सातारा जिल्हयामध्ये 242, सोलापूर जिल्हयामध्ये 252, सांगली जिल्हयामध्ये 852 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 148 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 4 लाख 97 हजार 913 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 17 लाख 1 हजार 606 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.