शबनम न्यूज / पिंपरी
जागतिक डॉक्टर डे निमित्त सर्व डॉक्टर वर्ग यांचा सन्मान आणि सत्कार होत असताना पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे युवा नेते प्रसाद कोलते व सौ.प्रिया प्रसाद कोलते (सामाजिक कार्यकर्त्या) यांच्यावतीने या डॉक्टर डे निमित्त प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला कोरोनाच्या संकट काळात आपल्या जिवाची पर्वा न करता अविरतपणे रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे आणि या निमित्तानेच सर्व डॉक्टर वर्गांचा सन्मान सत्कार तसेच कोरोना योद्धा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती युवा नेते प्रसाद कोलते यांनी दिली
१ जुलै२०२१ हा संपूर्ण देशात ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’ म्हणुन साजरा केला जातो. गेले दीड वर्ष कोरोना काळात स्वताच्या जिवाची परवा न करता सर्व नागरिकांची आहोरात्र सेवा करत असणारे देशातील व महाराष्ट्रातील व प्रभाग क्रं. १३ यमुनानगर, निगडी येथील विविध ठिकाणी सर्व रुग्णालयांना भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या
यामुनानगर रुग्णालय,ओंकार क्लिनिक,गोसावी हॉस्पिटल,श्रीनिवास हॉस्पिटल,बाबा अलम आयुर्वेदिक क्लिनिक व इतर सर्व डॉक्टरांचा आज ‘डॉक्टर्स डे’ निमित्त सन्मान करण्यात आला.
यावेळी सौ.प्रिया प्रसाद कोलते (सामाजिक कार्यकर्त्या) श्रीमती.रेश्मा रविंद्र साळवी (महिला भोसरी विधानसभा उपाध्यक्ष), सौ.नलिनी बाळकृष्ण साळी (महिला भोसरी विधानसभा उपाध्यक्ष), सौ.वैशाली फुलचंद पवार (महिला प्रभाग अध्यक्ष),सौ.सुरेखा विजय फड (महिला प्रभाग सरचिटणीस), सौ.शकुंतला आनंता दहातोंडे (महिला प्रभाकर चिटणीस),सौ.पूजा प्रमोद गरड (महिला वॉर्ड अध्यक्ष),(सामाजिक कार्यकर्ते)सौ.सारिका कोलते, सौ.अर्चना कौशिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.