स्वर्गीय काका यांना यश साने च्या दुःखद अंतःकरणातून भावपूर्ण श्रद्धांजली
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
स्वर्गीय दत्ता काका साने यांना आज एक वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने त्यांचे सुपुत्र राष्ट्रवादी चे विद्यार्थी शहर अध्यक्ष यश साने यांनी दुःखद अंतकरणातून भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे, आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी स्वर्गीय काका यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना एक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या
आज १ वर्ष झालं तूम्ही आम्हाला सोडून गेलात. पण अजूनही तुम्ही आमच्या सोबतच आहात असच वाटत. आजही भावपूर्ण श्रद्धांजली लिहायला हात कापतात,शब्द सुचत नाहीत, मन धजत नाही.
आज १ वर्ष झालं, प्रत्येक पावलावर तुमची आठवण येते, माझं, आपल्या परिवाराचं काय संपूर्ण चिखली आणि परिसरातील नागरिकांच मन प्रत्येक दिवशी तुमची आठवण काढत. तुम्ही गेलात पण जाताना आठवणींचा भला मोठा पेटारा सोडून गेलात, विचारांचा, संस्कारांचा एक मोठा वारसा आमच्यासाठी देऊन गेलात. माझ्यासाठी तर आज माझं जे सर्वस्व आहे ते देखिल तुम्हीच.
निष्ठूर नियतीने जरी आपली ताटातूट केली असली तरी संस्कार अन विचारांनी तुम्ही कायम माझ्या सोबत आहात. तुमच्या शिकवणीमुळे आजवर दुःखाला आवर घालण्याचा प्रयत्न क्षणोक्षणी केला, स्वतः ला , परिवाराला आणि आपल्या लोकांना सांभाळलं पण आज आसवांचा बांध फुटल्याशिवाय राहत नाही, ही क्रूर सकाळ मनात कायमचा काळा कोपरा तयार करून गेलीय, माझं सर्वस्व माझ्यापासून हिरावून गेलीय.
आज प्रथम पुण्यस्मरण दिनी तुम्हाला श्रद्धांजली वाहताना एक शब्द देतो, मी तुमच्या संस्कारांची शिदोरी घेऊन तुम्ही दाखवलेल्या रस्त्याने तुमची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
तुमचाच
यश दत्ताकाका साने