शबनम न्यूज प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा 22 मार्च रोजी संपन्न होणार आहे मुंबई येथील शिवतर्थ मैदानात बुधवारी 22 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता हा मेळावा संपन्न होणार असून या मेळाव्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत पिंपरी चिंचवड शहरातून सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना मुंबईला जाण्यासाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली. शहरातील ज्या नागरिकांना येण्याची इच्छा असेल त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केले आहे. नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत मनसेचे सर्व पदाधिकारी सर्व चार उपाध्यक्ष विभाग अध्यक्ष संघटक उपविभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष व असंख्य मनसेचे सैनिक उपस्थित होते.