शबनम न्युज | तळेगाव दाभाडे
तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचे दर्शन घेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (मंगळवारी) तळेगावकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
दरवर्षी गुढीपाडव्याला ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा उत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने खासदार बारणे यांनी तळेगावमध्ये येऊन श्री डोळसनाथ महाराजांचे आशीर्वाद घेतले.
त्यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे मावळ तालुका प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, भाजपचे शहराध्यक्ष अशोक दाभाडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, मावळ तालुका संघटक सुनील तथा मुन्ना मोरे तसेच रामभाऊ सावंत, शहर प्रमुख देव खरटमल, चंद्रकांत भोते, विशाल हुलावळे, गिरीश सातकर, प्रवीण ढोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
मंदिराचे विश्वस्त राजेश सरोदे तसेच उत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार बारणे यांचे स्वागत केले तसेच सत्कार करून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
भाजपचे तळेगाव शहराध्यक्ष अशोक दाभाडे यांच्या निवासस्थानी देखील खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी रवींद्र भेगडे, नितीन पोटे, प्रमोद देशक, विनायक भेगडे, शोभाताई परदेशी, रजनी ठाकूर, अरुण भेगडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
माजी नगरसेविका शोभाताई अरुण भेगडे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळतात्या भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण पवार, माजी नगराध्यक्ष सुलोचनाताई आवारे यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली.