शबनम न्युज / पिंपरी
लसीकरण नियोजनात बदल करावा, टोकण वाटण्याचे काम स्टाफने करावे तसेच लसीकरण कामकाजापासुन नगरसेवक,त्यांचे कुटुंबीय, कार्यकर्ते यांना लांब ठेवावे,अशी मागणी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नगरसेविका बारसे म्हणतात, सध्या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण चालू आहे .
वय वर्षे ४५ च्यावर ऑफलाइन आणि १८ ते ४४ ला ऑनलाइन नोंदणीने लसीकरण चालू आहे .
१८ ते ४४ लसीकरण ५०% ऑनलाइन आणि ५०% ऑफलाइन करावे कारण ब-याच नागरिकांना ऑनलाईन बुकिंग करता येत नाही .
विशेषतः महिला या लसीकरणापासून वंचित राहत आहेत .
महिला,दिव्यांग आणि अशिक्षित नागरिकांच्या तक्रारी येत आहेत की आम्हाला ऑनलाइन बुकिंग करता येत नाही. आमच्यासाठी ऑफलाइनची सोय ठेवावी.
तसेच वय वर्षे ४५ च्यावर ज्यांचे लसीकरण करायचे आहे त्यांना सेकंड डोस असलेल्यांना प्राधान्य द्यावे.
कारण पहिला डोस वाले लसीकरणाला जास्त येतात. टोकन मिळालेले असल्यामुळे पहिला डोस घेऊन नागरिक जातात आणि त्यामुळे सेकंड डोसवाले ८४दिवसाच्यावर महिना सव्वा महिना झाला तरी त्यांना सेकंड डोस मिळत नाही .
त्याबाबतीत आपण व्यवस्थित नियोजन करावे .
तसेच नगरसेवकांना त्यांच्या कुटुंबीयांना, कार्यकर्त्यांना या लसीकरण प्रक्रियेपासून लांब ठेवावे.
टोकन वाटण्याचे काम हे लसीकरण केंद्रावर आहे त्या स्टाफने लसीकरण केंद्रावर लसीकरण चालू होण्याच्या एक तास आधी म्हणजे दहा वाजता चालू होणार असेल तर सकाळी नऊ वाजता या स्टाफ मधल्या कर्मचाऱ्यांनी टोकन वाटावे.
हे टोकन आदल्या दिवशी रात्री किंवा पहाटे सहा वाजायच्या आधीच संपलेले असतात हे जाणीवपूर्वक मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छित आहे .
आणि अगदीच आपल्याला योग्य वाटत असेल तर एकूण लसीकरण केंद्रावरील लसीचा एक टक्का लस्सी नगरसेवकांसाठी अधिकृतरीत्या राखीव ठेवाव्यात
तरी विशेष लक्ष देऊन या बाबींकडे आपण लक्ष द्यावे अशी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आयुक्त पिचिमनपा यांना निवेदनातून सुचविले आहे .असे हि दिलेल्या निवेदनात नगरसेविका प्रियांका बारसे यांनी म्हंटले आहे.