शबनम न्यूज | पिंपरी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सारिका पवार ( शहर अध्यक्ष ओ बी सी राष्ट्रवादी महिला पिंपरी चिंचवड) यांनी प्रभाग क्र.11 मध्ये नक्षत्रम सो.व विविध सोसायटी मध्ये वृक्ष रोपण व प्रभागातील आरोग्य व सुरक्षा कर्मचाऱ्यांना विविध वस्तूचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला.
सदर कार्यक्रम शहराच्या महिला शहरअध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी वैशाली काळभोर यांनी प्रभागात पक्ष मजबूत करण्यावर भर देऊन सारीकाताई च्या मागे भक्कम पाठबळ देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या महिला बचतगट महासंघाच्या अध्यक्षा कविता ताई खराडे ,कुशाग्र भाऊ कदम (अधक्ष्य-कुशाग्र युवा फोडेशशन) ,सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा गंगा ताई धेंडे,श्री.,भोसरी ओबीसी सेल चे अध्यक्ष मनोज सुतार,युवक सरचिटणीस योगेश मोरे,सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम,तसेच प्रदीप खोत,दीपक चव्हाण,राजेश नायर, प्रशांत बडगुजर,अनिकेत उबाळे,राजेश नायर,महिला आघाडीच्या सौ.स्वाती गिरगुणे,प्रणिती शिंदे,मनीषा महाजन,नेहा काळे,कांचन माने,अश्विनी होणाडे,सविता समुद्रे, दास ताई,सदर कर्यक्रमाचे सूत्र संचालन रुपाली पवार यांनी केले.