शबनम न्युज / पिंपरी-चिंचवड
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 30 च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती माई काटे व युवा नेते शेखर काटे यांच्यावतीने रिक्षाचालकांसाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत प्रभाग क्रमांक 30 मधील सर्व रिक्षा चालकांना मोफत सीएनजी गॅस भरून मिळणार आहे. याकरिता रिक्षा चालकांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या नाव नोंदणीकरिता रिक्षाचालकांनी आपले रिक्षा परमिट, आधार कार्ड व मतदान कार्ड सोबत नगरसेविका स्वाती माई काटे यांचे जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क साधावा, रिक्षाचालकांनी 23 जुलै रोजी कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन युवा नेते शेखर काटे यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement