शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड मार्फत ऑगस्ट 2021 करीता पुढीलप्रमाणे अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे पिंपरी- चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
हि बातमी पण वाचा : Kolhapur : शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली भेट
अनुज्ञप्ती शिबीर दौरा पुढीलप्रमाणे- माहे ऑगस्ट 2021 खेड येथे दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2021, मंचर येथे दिनांक 9 व 10 ऑगस्ट 2021, जुन्नर येथे दिनांक 17 व 18 ऑगस्ट 2021, वडगाव मावळ येथे दिनांक 23 व 24 ऑगस्ट 2021 रोजी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी अपॉईंटमेंट घेतलेल्या वेळेतच हजर व्हावे. जेणेकरुन गर्दी टाळणे शक्य होईल., सामाजिक अंतर पाळावे तसेच मास्क, हातमोजे व सॅनिटायझर याचा वापर करावा, असेही पिंपरी- चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.