भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांची माहिती
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समितीचे सभापती एडवोकेट नितीन लांडगे यांची काल एसीबी वतीने चौकशी करण्यात आली व त्यांना संध्याकाळी ताब्यात घेण्यात आले या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रथम प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी याबाबत विरोधकांकडून कटकारस्थान करून आमच्या लोकप्रतिनिधींना अडकविण्यात येत असल्याची सांगितले.
पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना सुनियोजित षडयंत्र आखून जाळ्यात अडकविल्याचे एकूण परिस्थितीवरून लक्षात येत आहे. मात्र, या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेऊन या कटकारस्थानाचा मूळ शोधण्यासाठी भाजपाच्या पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरीताई मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
माधुरीताई उद्या दिनांक 20 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवडला जाणार असून, त्या सर्वांची भेट घेऊन या तक्रारी मागचे सत्य जाणून घेतील आणि त्याचा अहवाल माझ्याकडे सुपूर्द करतील, असेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या लोकप्रतिनिधींवर आरोप केले जात आहेत. त्यांना अडकविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे व लवकरच सत्य बाहेर येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.