महाराष्ट्र वारकरी महामंडळ वतीने पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदन
पिंपरी-चिंचवड शहर संतांची भूमी आहे शहराच्या विकासात संतांच्या उपक्रमांना स्थान द्यावे
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे महाराष्ट्र वारकरी महामंडळ वतीने निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात नमूद केले आहे की श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम महाराज महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांचे पालखीचे स्वागत नेहमीच मनपा वतीने करण्यात येतात तसेच शहरातून या पालख्या पुढील मार्गक्रमण करीत असताना मनपा वतीनेही भाव अशी भूमिका पार पाडली जाते महामंडळ वतीने मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पुढील प्रमाणे मागणीची निवेदन देण्यात आले आहे.
- नियोजित मेट्रो सुरू होत आहे त्या सर्व पोलवर सर्व संतांचे म्युरल मधील चित्र आणि अभंग लावणे.
- मेट्रो मार्ग या पालखी सोहळ्याची जनक तपोनिधी श्री नारायण महाराज, (निगडी, दापोडी, पुणे मेट्रो महामार्ग) सद्गुरु श्री हैबतराव बाबा आरफळकर नियोजित (भोसरी कासारवाडी मोशी मेट्रो महामार्ग )सेतू असे नामकरण करणे
- वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वानंद सुखनिवासी श्री जोगमहाराज (सद्गुरु श्री विष्णुबुवा जोग) हे पैलवान होते त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पिंपरी गावातील वाड्याला नाम फलक लावणे तसेच पिंपरी गाव येथे त्यांचा पुतळा तसेच प्रवेशद्वार उभारणे
- महानगरपालिका दरवर्षी अनेक थोरामोठ्यांचे जयंती पुण्यतिथी उत्सव संपन्न करीत असतात त्याच विचारधारेप्रमाणे दरवर्षी वारकरी संमेलन अखंड हरिनाम सप्ताह यांचे नियोजन करण्यात यावे
- संत श्री तुकाराम महाराजांची पालखी पहिला मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर येथे होत असतो वाढते शहरीकरण, नागरीकरणामुळे पालखीतील दिंड्यांना वारकरी मंडळी फडकरी यांना निवासा करिता जागेची अडचण भेडसावत असते आकुर्डी येथील सेक्टर नंबर 28 शेजारी मनपा कर संकलन विभाग येथील इमारतीत श्री संत नामदेव महाराज वारकरी भवन उभारणे बाबत उचित कारवाई व्हावी, सदर इमारतीत पालखी मुक्कामी दिंडी वारकरी वारकरी विशेषता महिला दिंड्यांना निवासाची व्यवस्था होऊ शकते
- संत विद्यापीठ चिखली येथील व्यवस्थापन समिती मध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी, श्री क्षेत्र आळंदी ,श्री संत तुकाराम महाराज संस्थान ,श्री क्षेत्र देहू ,चिंचवड देवस्थान चिंचवड आणि पिंपरी चिंचवड भोसरी या प्रादेशिक विभागातील चिंचवड देवस्थान चिंचवड आणि पिंपरी चिंचवड भोसरी या प्रादेशिक विभागातील वारकरी संप्रदायातील प्रत्येकी एक प्रमाणे स्थानिक समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी
- मनपा सभागृहात श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज ,श्री मोरया गोसावी महाराज यांचे चैतन्य चित्र लावण्यात यावे
- निगडी आणि दापोडी थोरल्या पादुका चऱ्होली , मोशी ,देहू फाटा, दिघी येथे पालख्यांचे स्वागत कमान नामफलक म्हणून कायमस्वरूपी उभारण्यात यावी
- आकुर्डी, पिंपरी गाव, दिघी रोड कॉलनी, दापोडी चिंचवडगाव येथे पालखी तळ बोर्ड लावणे
- मनपाच्या वाचनालयात विविध धार्मिक ग्रंथ संतांचे प्रकाशित ग्रंथ वाचण्याकरिता उपलब्ध करावी
- पालखी मार्गावर संत वचने लावणे आणि वृक्षारोपण करणे ही कामे करण्यात येईल
- चिखली येथील संत विद्यापीठात सकल संतां चे तैलचित्र आणि संक्षिप्त माहिती म्युरल मध्ये रेखाटणे
- शहरातील मंदिरे प्रार्थनास्थळे परिसरात निर्माल्य कुंड ठेवणे
- शहरातील स्मशानभूमी येथे अधिकाधिक वृक्षारोपण करून संतवचने लावणे
या विषयावर अ प्रभाग समिती मनपा 2002 ते 2007 काळात ठराव संमत झालेला आहे याप्रमाणे मनपा वतीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र वारकरी महामंडळ वतीने करण्यात आले आहे सदर निवेदनावर ह भ प विजय अण्णा जगताप महामंडळ अध्यक्ष व ह.भ.प. जयंत उर्फ आप्पा बागल महामंडळ सचिव यांची स्वाक्षरी आहे