शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 23 प्रसून धाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस काउंटी, थेरगाव गावठाण, पडवळ नगर भाग, अशोका सोसायटी, साईनाथ नगर, समर्थ कॉलनी इत्यादी प्रभागातील परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापती, नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी कार्यकारी अभियंता दूरसंचार विभाग पिं.चिं.मनपा यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 23 प्रप्रसून धाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस काउंटी, थेरगाव गावठाण, पडवळ नगर भाग, अशोका सोसायटी, साईनाथ नगर, समर्थ कॉलनी या परिसरामध्ये दाट लोकवस्ती असून गेल्या काही वर्षात या परिसरात मारामारी, गाड्यांची जाळपोळ, सोनसाखळी चोरी, दरोडा, महिलावर्गाला, मुली व जेष्ठ नागरिक यांना त्रास देणे अशा गोष्टी या परिसरात स्थानिक गुंडांकडून सर्रास होत असून अशा वाढत्या गुन्हेगारीच्या होणाऱ्या त्रासापासून नागरिकांना मुक्तता मिळावी, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, तसेच सदरच्या सीसीटीव्ही कॅमेरा ची जोडणी स्थानिक पोलिस स्टेशन मार्फत पोलीस आयुक्तालयात करावी, जेणेकरून त्यामुळे जलद गतीने पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रसून धाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस काउंटी, थेरगाव गावठाण, पडवळ नगर भाग, अशोका सोसायटी, साईनाथ नगर, समर्थ कॉलनी इत्यादी संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरा नजर राहून गुन्हेगार पकडले जाण्यास पोलीस प्रशासनास ,मदत होईलच तसेच प्रभाग सुरक्षित राहण्यास नक्कीच मोलाची मदत होईल अशी मला खात्री आहे. तरी सदर प्रस्तावाचा सकारात्मक विचार करावा व चालू आर्थिक वर्षात तरतूद करून लवकरात लवकर काम सुरू करावे, असेही नगरसेविका मनीषा पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.