शबनम न्यूज / पिंपरी
महिलांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तसेच महिलांनी स्वावलंबी होऊन व्यावसायिक जगतात आपली नवीन ओळख निर्माण करावी या हेतूने तेजस्विनी महिला बचत गट स्थापन करण्यात आले या बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे याची प्रचिती पिंपरी-चिंचवड शहरात येत आहे आज दिनांक 18 जून 2021 रोजी तेजस्विनी महिला बचत गट शॉपचे भोसरीतील पहिल्या आणि पिंपरी चिंचवड मधील तिसऱ्या शॉपच्या उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराच्या उपमहापौर हिराबाई (नानी) घुले यांच्या हस्ते संपन्न झाले
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन स्वावलंबन प्रकल्पाअंतर्गत गव्हाणेवस्ती, भोसरी येथे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि खाद्य पदार्थांच्या विक्रीसाठी तेजस्विनी महिला बचत गट शॉपचे भोसरीतील पहिल्या आणि पिंपरी चिंचवड मधील तिसऱ्या शॉपच्या उद्घाटन प्रसंगी, मा. सौ. पूजाताई लांडगे (अध्यक्षा – शिवांजली सखी मंच), मा. हिराबाई घुले (उपमहापौर), मा. सौ. सोनाली ताई गव्हाणे (शहर सुधारक समिती- सभापती), नितीन आप्पा काळजे (माजी महापौर), मा. संतोष लोंढे ( माजी स्थायी समिती अध्यक्ष), मा. राजेंद्र भाऊ लांडगे क प्रभाग समिती -सभापती ), अर्चना क्षीरसागर (वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी ,पुणे, माविम ), श्री .प्रशांत कवटे सर (मार्केटिंग सल्लागार) , सुजाता परदेशीं (भोसरी क्षेत्रीय समन्वयक ), सुदर्शना पाटील (सहयोगिनी) राजश्रीताई जायभाय- (अध्यक्ष भाजप कामगार आघाडी पश्चिम महाराष्ट्र,) गीता महेंद्रू (अध्यक्ष भोसरी – भाजप चरोली मंडल) हे मान्यवर उपस्थित होते
या शॉप च्या माध्यमातून बचत गटातील महिलांना आपले उत्पादन विक्री करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. तसेच तेजस्विनी नावाने महिलांच्या उत्पादनांसाठी नवा ब्रँड तयार होत आहे. मिशन स्वावलंबन प्रकल्पाअंतर्गत भविष्यात अनेक रिटेल चेन शॉपचे नियोजन आहे.