शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
अनुजा चैतन्य जोशी यांनी आपल्या कमर्शियल आर्ट्स अंतर्गत सुपारीवर गणपती, बेलाच्या पानावर महादेव, केळीच्या पानावर राम अशा अनेक कलाकृती केल्या आहेत. त्यांनी आपला अनुभव शबनम न्यूज वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड शहरात निगडी येथे वास्तव्यास असलेल्या अनुजा जोशी यांना पहिल्यापासूनच ड्रॉइंग ची आवड होती. त्यांनी अभिनव कॉलेज मध्ये कमर्शिअल आर्ट्स चे शिक्षण घेतले. आतापर्यंत त्यांनी बर्याच प्रकारच्या पेंटिंग केले आहेत. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शब्दात दिलेली माहिती याप्रमाणे, आतापर्यंत मी बऱ्याच प्रकारच्या पेंटिंग केल्या आहेत. जस की, माझ्या हातावर नवरात्रीमध्ये “महालक्ष्मी” च पेंटिंग केले होते.नंतर ठरवलं की आता काही तरी वेगळं केलं पाहिजे, ड्रॉईंग पेपर वर तर आपण चित्र काढू शकतो पण जर आपण झाडाच्या पानावर पेंटिंग केलं तर कस वाटेल ,म्हणून मी आधी “महाशिवरात्रीला” बेलाच्या पानावर महादेवाचं पेंटिंग केलं ते पूर्ण झाल्यावर खूप मस्त वाटत होतं, म्हणून मी असच वेगवेगळ्या पानांवर पेंटिंग करत गेले. “आंब्याच्या पानावर गुढीपाडव्याच”, “केळीच्या पानावर रामाचं” नंतर “रुईच्या पानावर हनुमानाच” असे झाडाच्या पानांवर बरेच पेंटिंग केले. नंतर म्हणलं आपण गणपती मध्ये काहीच नाही केलं झाडाच्या पानावर तर खूप झाले आता वेगळं काही तरी करू म्हणून खूप विचार केल्यानंतर एक कल्पना सुचली आपण जर “सुपारी” वर पेंटिंग केलं तर जमेल का मग “सुपारीवर पेंटिंग” करायला घेतलं मी ते झाल्यानंतर खूप छान वाटत होते “गणपतीची मुर्ती नसेल तर आपण सुपारी ठेवतो पण मी सुपारी वरच गणपती बाप्पा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.” मला ते पूर्ण करायला 7 तास लागले. सगळ्या लोकांनी आणि माझ्या घरच्यांनी पण माझा खूप उत्साह वाढवला त्यांनी माझ्या कलेला दाद दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.
अनुजा जोशी यांना त्यांच्या अभिनव कलेच्या माध्यमातून अनेक प्रगतीची शिखर मिळो, अशी आम्ही आमच्या शबनम न्यूज च्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.