शबनम न्यूज – पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात कुशाग्र कदम युथ फाउंडेशन (KKYF) तर्फे श्रीसाई विरंगुळा केंद्र संभाजी नगर चिंचवड येथे ज्येष्ठ नागरिक तसेच खुल्या गटासाठी कॅरम सिंगल आणि कॅरम डबल्स स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा शुभारंभ सकाळी ११.०० वाजता मा. श्री.कुशाग्र कदम यांचे शुभ हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास योगेश मोरे सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस KKYF चे कार्यकर्ते तसेच विरंगुळा केंद्रातील सर्व सभासद उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी उपस्थित जेष्ठ नागरिक सर्वश्री, साळवे, सराटकर, नागुल, वाघुळदे,वाघमारे, यांनी आपापले मनोगत व्यक्त करून KKYF च्या वाटचालीस तसेच मा. कुशाग्र कदम यांस शुभेच्छा दिल्या. माननीय श्री.कुशाग्र कदम यांनी देखील KKYF चे पुढील उपक्रमा संदर्भात माहिती देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कानवडे यांनी केले.
शुभारंभ झाल्यानंतर लगेच स्पर्धेला सुरुवात झाली. या सर्व स्पर्धेमध्ये सर्व मिळून एकंदरीत ९८ स्पर्धकांनी भाग घेतला आहे. पहिल्या दिवशी पहिल्या फेरीतील जवळपास सर्व सामने तसेच दुसऱ्या फेरीतील काही सामने अत्यंत उस्फूर्तपणे आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.सर्व स्पर्धकांनी उस्फूर्तपणे आणि मनमुराद सामन्यांचा आनंद लुटला. स्पर्धा यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व सभासद मोलाचे सहकार्य करीत आहेत.सर्वांचे विशेष आभार.उर्वरित सामने आज दि.२४/०९/२०२१ सकाळी ठीक ११.०० वा.सुरू करण्यात येतील..