शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात प्लास्टीक वापरावर बंदी असतानाही त्याचा वापर करणा-यांविरुध्द कारवाईची मोहिम सुरु करण्यात आली असून, आज दिनांक २४ रोजी क प्रभाग मध्ये प्लास्टिक बंदी व नॉन कंपोस्टिंग साठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक बंदी साठी १० हजार रुपये व नॉन कंपोस्टिंग साठी ५ हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
Advertisement
सदर कारवाई ही आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय दवाले, शांताराम माने, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, वैभव कंचनगौडा यांनी केली.
Advertisement