शबनम न्युज | तळेगाव दाभाडे
तळेगाव दाभाडे | प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे शहरातील १९ केंद्रांवर ‘महालसीकरण अभियान’ राबविण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, श्री संत कैकाडी महाराज समाज मंदिर, लायन्स क्लब, युनिक हॉस्पिटल, कन्याशाळा,अथर्व हॉस्पिटल, हरणेश्वर हॉस्पिटल, सेवाधाम हॉस्पिटल या केंद्रांवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भेट दिली. या लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स व नागरिकांशी संवाद साधला.
याप्रसंगी आमदार सुनील शेळके म्हणाले कि, संपूर्ण मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकास लस मिळावी, या उद्देशाने महालसीकरण अभियानाचा चौथा टप्पा राबविण्यात येत आहे. प्रशासकीय यंत्रणेसह, खाजगी हॉस्पिटल, डॉक्टर्स, कर्मचारी, स्वंयसेवक,सामाजिक संस्था यांनी सामाजिक भावनेतून सहकार्य करीत या महालसीकरण अभियानास बळ दिले आहे. आपणही सर्वांनी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स यांचा आदर ठेवत सहकार्य करुन हे अभियान यशस्वी करायचे आहे. लसीकरणास व्यत्यय येऊ नये,नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सर्व केंद्रावर माझे सहकारी सुद्धा उपस्थित असून नागरिकांची काळजी घेत आहेत.
यावेळी मुख्याधिकारी सतीश दिघे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, वैद्यकीय अधिकारी .गुणेश बागडे, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, नगरसेवक संतोष भेगडे, आनंद भेगडे, विशाल दाभाडे, नगरसेविका संगिताकाकी शेळके, मयुर टकले,संकेत खळदे, महेश बेंजामिन, लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, दिपकभाई शहा, दिपक बाळसराफ, राजश्रीताई शहा, प्रमिलाताई वाळुंज, मनोहर दाभाडे, सुनिल वाळुंज,राजेंद्र झोरे,गौरव शहा,सिद्धार्थ किल्लावाला, इतर मान्यवर व युवा मंचचे सर्व सदस्य उपस्थित होते.