शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्यात येत असून त्याची अनुदान मर्यादा कमाल 7 लाख करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन समिती पुणे अंतर्गत व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शासकीय विभाग, आदिवासी व समाज कल्याण विभागांतर्गत आश्रमशाळा यांना खुले व्यायामशाळा साहित्य व्यायमशाळा साहित्य खरेदीसाठी रुपये 7 लाख मर्यादेत व्यायाम साहित्याचा पुरवठा करण्याचे प्रस्तावित करण्यात येते.
अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये व्यायामशाळा असल्यास व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. दलित वस्ती किंवा वस्तीच्या नजीकच्या परिसरात सुयोग्य मोकळी जागा उपलब्ध असल्यास खुले व्यायामशाळा साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीचा सदर जागेत व्यायाम साहित्य बसविण्याचा ठराव जोडावा लागेल.
आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायती व आदिवासी शाळा तसेच आदिवासी क्षेत्रालगत ग्रामपंचायती व शाळांना व्यायाम साहित्य व खुले व्यायामशाळा साहित्याचा पुरवठा करण्यात येतो.
क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शासकीय विभाग, आदिवासी व समाज कल्याण विभागांतर्गत आश्रमशाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळांना रुपये 7 लाख मर्यादेत क्रीडासाहित्याचा पुरवठा करण्याचे प्रस्तावित करण्यात येते.
दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व पात्र विभागांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा-स.नं.191 विभागीय क्रीडा संकुल महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूलसमोर येरवडा पुणे येथे विहीत नमुन्यातीलअर्जासह 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावे. अधिक माहितीसाठी www.dsopune.comया संकेतस्थळाला भेट द्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राकेश बागुल यांनी कळविले आहे.