शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव ते मार्केट यार्ड या मार्गावरील निघालेल्या पीएमपीएल बसने अचानक पेट घेतली. सीएनजी बस क्र. एम एच 12 एच बी 1438 या दापोडी ते पिंपळे गुरव जोडणाऱ्या पवना नदीवर जात असताना अचानक बसने पेट घेतली .अचानक लागलेल्या या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले.
Advertisement
यावेळी बसचे चालक व वाहक यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरवण्यात यश मिळवले. काही मिनिटातच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Advertisement