दापोडी परिसरात महिला भाजी विक्रेत्यांसाठी सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देण्याची मनपा आयुक्तांना मागणी
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
दापोडी : पिंपरी-चिंचवड परिसरातील दापोडी भागात भाजीविक्रेत्यांची संख्या मोठी आहे दापोडी परिसरात भाजी मंडई, व्यापारी, दुकाने मोठ्या प्रमाणात असून या भाजी मंडई मध्ये भाजीविक्रेत्या महिलांचे प्रमाण जास्त आहे, परंतु या भाजीविक्रेत्या महिलांसाठी दापोडी परिसरात शौचालय उपलब्ध नाही जे पदचारी मार्गावर सार्वजनिक शौचालय आहेत त्यांची अवस्था अत्यंत खराब असून येथील नागरिकांना याची सुविधा उपलब्ध होत नाही तसेच या परिसरातील भाजी विक्रेत्या महिलांना शौचालय अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या सर्व समस्या दापोडी परिसरातील शिवसेनेच्या युवती सेना पदाधिकारी सुषमा आदित्य अजित शेलार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या या महिला भाजी विक्रेत्यांच्या मदतीला पुढे आले आहेत त्यांनी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांना याबाबत माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दापोडी परिसरात महिला भाजीविक्रेत्या करिता शौचालय उभारण्याची मागणी केली आहे
या मागणीचे निवेदन देतांना सुषमा शेलार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की या महिला भाजी विक्रेत्यांना शौचालय उपलब्ध करून देण्यात यावी या ठिकाणी शौचालय उपलब्ध नसल्याने महिलांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे तसेच जे सार्वजनिक शौचालय उपलब्ध आहेत ते अत्यंत खराब अवस्थेत असून येथे पाण्याचीही सोय नसते तसेच वेळोवेळी या शौचालयांची स्वच्छता हि केली जात नाही तरी दापोडी परिसरात पादचारी मार्गावर नवीन शौचालय उभारण्यात यावे यावेळी या मागणीची दखल घेत आयुक्त राजेश पाटील यांनी सकारात्मकता दाखविली असल्याचे सुषमा शेलार यांनी सांगितले आहे.