शबनम न्युज | पुणे
आज अखिल मंडळी मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळासह हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ व श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ ट्रस्ट ही पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे नियोजित वेळेत म्हणजेच सायंकाळी ६ नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ ट्रस्टचे बाळासाहेब मारणे, श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट भूषण पंड्या आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुनीत बालन म्हणाले, विसर्जन मिरवणुकी करिता सायंकाळी सहभागी होत असलेल्या प्रमुख मंडळांनी केलेले सजावट व विद्युत रोषणाई हे सायंकाळ नंतरचे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असते. ते पाहण्यासाठी लाखो भाविक देशभरातून नव्हे तर जगभरातून येतात. त्यामुळे त्या सर्वांच्या भावनांचा विचार करता, ठरलेल्या वेळेतच सायंकाळी मिरवणुकीत सहभागी होणार आहोतच.
पुढे बोलताना अण्णा थोरात म्हणाले, पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत सर्व शिस्त पाळून लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपविण्याचा सर्व मंडळाचा प्रयत्न राहील, दरवर्षीच्या नियोजित वेळेपेक्षा आधी मंडळाला शक्य होणार नाही.
बाळासाहेब मारणे म्हणाले, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळाचे सजावट व विसर्जन रथ हे आकर्षण असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच मंडळ यंदा देखील सायंकाळी मिरवणुकी सहभागी होणार आहे.
पुढे बोलताना भूषण पंड्या म्हणाले, श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ सायंकाळी ६ :३० नंतर मिरवणुकीत सहभागी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या मंडळामागे हुतात्मा बाबू गेनू गणपती, भाऊ रंगारी गणपती आणि त्या पाठोपाठ अखिल मंडळी मंडळ विसर्जन मिरवणूक सहभागी होईल.