शबनम न्युज | नागपूर
महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या महाआयटी (एमआयटीसी) म्हणजेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ विभागाअंतर्गत विविध पदांची भरती केली जात आहे. या भरती अंतर्गत विविध विभागातील रिक्त पदे भरली जाणार असून, कोणतीही परीक्षा न घेता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे.
या भरती प्रक्रिया अंतर्गत वित्त अधिकारी, लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ खाते कार्यकारी या पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता बी कॉम, सीए इंटर आणि संबंधित कामाचा तीन ते पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक पदासाठी याव्यतिरिक्त सविस्तर शैक्षणिक पात्रता असून, त्यासाठी सविस्तर अधिक सूचना पुण्यात यावी.
सदर पदानुसार इच्छुकांनी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखती करीता हजर राहायचे आहे. मुलाखत 26 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.