अभिनेत्री परिणीती चोपडा आणि आपचे खासदार राघव चड्डा यांनी रविवारी 24 सप्टेंबर रोजी लग्न गाठ बांधली. उदयपूर मधील लीला पॅलेस येथे त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता राघव आणि परिणीती यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. परिणीतीने तिच्या इंस्टाग्राम वरून लग्नातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहे.
या फोटोमध्ये परिणीती आणि राघव यांनी लग्नासाठी अत्यंत साधा लोक केला होता. परिणीतीने लग्नासाठी खास क्रीम रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. तर खड्यांची मॅचिंग ज्वेलरीमुळे परिमितीचे सौंदर्य खुल्ले होते. परिमितीच्या चुनरीने सर्वांचे लक्ष वेधले होते. परिणीतीने लग्नात घेतलेल्या चुनरीवर राघव असं नाव लिहिलं होतं. फोटो पाहून अनेक चाहते दोघांच्याही जोडीला आशीर्वाद आणि प्रेम देत आहेत.