शबनम न्यूज | सांगली
सांगली | प्रतिनिधी
फडणवीस सरकारच्या काळापासून बांधकाम कामगारांना ५ हजार मदत, अवजार खरेदी अर्थसहाय्य, संरक्षण किट पेटी वाटप, दिवाळी बोनस, शिष्यवृती, शैक्षणिक मदत, विवाह अनुदान, वैद्यकीय मदत, मृत्यूपश्चात अर्थसहाय्य, जीवन विमा, दिवाळी बोनस या सारखे विविध आर्थिक लाभ दिला जात आहे, सदरचे लाभ आघाडी सरकारने नुकतेच बंद केलेले आहेत. याशिवाय ऑनलाईन प्रक्रियेने केलेले हजारो बांधकाम कामगार नोंदणी अर्ज तातडीने निकाली काढावेत.
या मागणीसाठी सांगली येथे भाजपा कामगार आघाडी व स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या माध्यमातून सांगली येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य मोर्चा, धरणे आंदोलन, खरडा भाकरी – बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
इस्लापूर शहरापासून रॅलीद्वारे अंदोलनास सुरुवात करण्यात आली. हजारो बांधकाम कामगार उपस्थितीत महाराष्ट्र भाजपा, कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांच्या नेतृत्वाखालील सदरचे आंदोलन पार पडले.
यावेळी श्री ताठे यांनी भाषणात आघाडी सरकारकडून बांधकाम कामगार निधीतील १२ हजार कोटीचा निधी गायब असलेची शंका उपस्थित केली.
देवेंद्र फडणवीस सरकारकडून सुरु केलेल्या बांधकाम कामगारांच्या विविध योजना महाविकास आघाडी सरकार कडून बंद केल्या आहेत? पुरेसा निधी शिल्लक असतानाही शासन अन्याय करीत असलेने, ऐन दिवाळीत राज्यभर ११ लाख बांधकाम कामगार अक्षरश: हैराण झालेले आहे.
सदरच्या आंदोलनात माजी आमदार नितीनराजे शिंदे, प्रदेश भाजपा कामगार आघाडीचे सरचिटणीस हनुमंत लांडगे, उपाध्यक्ष व स्वराज्य जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष अमित कदम, प्रदेश सरचिटणीस, पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस अविनाश मोहिते, कामगार नेते संदिप पाटोळे, राहुल धोत्रे उपस्थित होते.
यावेळी प्रदेश भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सचिव एकनाथ बागडी, प्रदेश सदस्य अशोक वनवे पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश बडदे, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव साने, सांगली जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, शैलजा कोळी, सातारा जिल्हा सरचिटणीस भाईजी गावडे, कराड शहराध्यक्ष विश्वनाथ फुटाणे आदी उपस्थित होते.
हजारो वंचित बांधकाम कामगार महिला पुरुषासह उपस्थित मान्यवरानी सांगली येथील कामगार कार्यालयासमोर खराडा भाकरी खाऊन महाविकास आघाडी सरकारचा बोंबाबोंब करत घोषणा देऊन निषेध नोंदविला. तसेच यावेळी कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या कार्यालयात याबाबतचे निवेदन देण्यात आले.