शबनम न्युज | पिंपरी
गुरुवार दि.०९/०३/२०२३ रोजी तुकाराम महाराज बीज दिनाचे शुभेच्छा देत जगदगुरु तुकाराम महाराजांच्या “पिकवावे धन | ज्याची आस करी जन ||” या तत्वास अनुसरून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अमृतकाळातील पंचामृत ध्येयावर आधारित पहिला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये
१) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
२) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
३) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
४) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
५) पर्यावरणपूरक विकास
समावेश आहे.
अर्थसंकल्प म्हटलं की सर्वसामान्य जनतेला अपेक्षा असते की आपल्या खिश्यावर पडणारे भार कमी होऊन बचत वाढली पाहिजे आणि या अर्थसंकल्पने ही अपेक्षा शत प्रतिशत पुर्ण करून जनसामान्यांना दिलासा दिला आहे. महिला , विद्यार्थी , जेष्ठ नागरिक , शेतकरी , कष्टकरी , संघटित व असंघटित क्षेत्र आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे.
या अर्थसंकल्पात समाविष्ट महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे …
१)छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष. या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद.
यामध्ये आंबेगाव (पुणे) याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान तसेच राज्यातील विविध शहरांमध्ये शिवचरित्रावरील उद्याने उभारणार.
२)नमो शेतकरी महासन्मान निधी योजना , आता बळीराजाला वर्षाला १२,०००/-₹ सन्मान निधी मिळणार.
३) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीक विम्याचे कवच.
४)महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेचा लाभ.
५)”मागेल त्याला शेततळे” योजनेचा आता व्यापक विस्तार.
६)गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना २ लाखापर्यंत लाभ.
७) शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत. प्रतिवर्ष , प्रति शेतकरी १८००/- ₹ देणार.
८)जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा ५००० गावांमध्ये सुरू करणार.
९)जलजीवन मिशनसाठी सुमारे २०,००० कोटी रुपये तरतूद.
१०)राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेत तिकीट दरात महिलांना सरसकट ५०℅ सवलत.
११) लेक लाडकी योजना :-
पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना लाभ
जन्मानंतर मुलीला ५०००/-₹
पहिलीत ४०००/-₹
सहावीत ६०००/-₹
अकरावीत ८०००/-₹
मुलगी १८ वर्षाची झाल्यावर ७५,०००/-₹
१२) शिक्षणसेवकांना भरघोस मानधन , सरासरी १०,०००/- ₹ वाढ.
यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक ६०००/- ₹ वरून १६०००/- ₹.
माध्यमिक शिक्षणसेवक ८०००/- ₹ वरून १८०००/- ₹.
१३)आशा स्वयंसेवकां , अंगणवाडी सेविकाच्या मानधनात भरीव वाढ.
१४) नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे.
१५)महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये.
१६) विद्यार्थ्यांना भरीव शिष्यवृत्ती , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता ८ वी पर्यंत सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत.
५ वी ते ७ वी एक हजारवरून ५०००/-₹
८ वी ते १० वी १५००/-₹ वरून ७५००/-₹
१६)राज्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे ७०० आपला दवाखाना सुरू करणार.
१७) जेष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरुंगळा केंद्र , वयोश्री योजनेचाही विस्तार.
१८) दहा लाख घरांची मोदी आवास योजना
१९) विविध मेट्रो प्रकल्पांसाठी भरीव निधी तरतूद.
२०)महाराष्ट्राचा वैभव असलेल्या विविध धार्मिक क्षेत्राचा विकास.
२१)विद्यापीठे/शैक्षणिक संस्थाना ५०० कोटी रुपये अनुदान.
२२)राज्यात १४ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार.
२३) विमानातळांचा निर्माण व विस्तार.
२४)राज्यातील विविध समाजासाठी नवीन महामंडळाची घोषणा.
अश्या अनेक कल्याणकारी योजनांचा समावेश या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.