शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्र.१६ व १७ मध्ये चिंतामणी चौक,स्वामी समर्थ मैदान वाल्हेकरवाडी येथे दिवाळी फराळ,स्नेह मिलन व सुगम संगीत गितांचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महापौर माई ढोरे,सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,आयोजक बिभीषण चौधरी,आदेश नवले(उद्योजक), सोमनाथ भोंडवे(उद्योजक) निलेश भोंडवे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा प्रभागातील ६५० महिला बंधूभगिनी लाभ घेतला. यावेळी उत्कृष्ट कार्य करणार्या सात महिला बचत गटाचा भेट वस्तू देवून महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विलास चव्हाण,पाटीलबुवा चिंचवडे,दिलीप गडदे,नरेश गोरखा,प्रकाश आखाडे,अमर देशमुख,समाधान सोनवणे,विजय पवार,संजय गायकवाड,अंगद गरड सर,अनिलराव चव्हाण,सचिन राऊत,भूषन जोशी,डाॅ.दिपक चांदणे,अलका पांडे,स्नेहा गाडे,सौ.नवले,सविता पंडीत,अशोक येलमार तसेच निसर्ग सोसा,अथर्व पार्क,मोरया काॅ.,भोंडवे वस्ती,गुरूदवारा,रावेतमधील सर्व सोसा.चे पदाधीकारी व नागरिकांनी फराळ व गाण्यांचा आनंद घेतला.